Discover gkgadchiroli - The Essence of Gadchiroli District
gkgadchiroli represents the vibrant identity of Gadchiroli, a district in Maharashtra, India, renowned for its rich forests, and natural beauty.
प्रश्न: 1. गडचिरोलीचे सीईओ कोण आहे?
उत्तर: गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय गडचिरोली शहरात आहे. जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा, भा.प्र.से., हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. सुहास गाडे (IAS).
प्रश्न: 2. गडचिरोली कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: गडचिरोली जिल्हा त्याच्या घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे, जे जिल्ह्याच्या 76% क्षेत्रफळावर पसरलेले आहेत. येथे बांबूची झाडे, तेंदूपान आणि सागवानाचे व्यावसायिक वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले जाते. जिल्ह्यातील वैनगंगा ही मुख्य नदी आहे. याशिवाय, चपराळा वन्यजीव अभयारण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. तसेच, झाडीपट्टी रंगभूमी हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वैभव आहे, जे गडचिरोलीला वेगळेपण देते.
प्रश्न: 3. गडचिरोलीची सीमा काय आहे?
उत्तर:
गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य भागात वसलेला आहे. त्याच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
- उत्तर: गोंदिया जिल्हा
- पूर्व: छत्तीसगड राज्याचे मोहला-मानपुर-अंबागड चौकी, कांकेर, नारायणपूर आणि बिजापूर जिल्हे
- दक्षिण: तेलंगणा राज्याचे जयशंकर भूपलपल्ली जिल्हा
- पश्चिम: तेलंगणा राज्याचे मंचेरियल आणि कोमराम भीम जिल्हे तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा
प्रश्न: 4. गडचिरोलीमध्ये किती पंचायत समिती आहेत?
उत्तर: गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 पंचायत समिती आहेत.
प्रश्न: 5. गडचिरोलीमध्ये किती तहसील आहेत?
उत्तर: गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तहसील (तालुके) आहेत.
प्रश्न: 6. गडचिरोलीचा इतिहास काय आहे?
उत्तर: गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करून झाली. यापूर्वी गडचिरोली आणि सिरोंचा हे दोन तालुके चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होते. प्राचीन काळी हा प्रदेश राष्ट्रकुट, चालुक्य आणि देवगीरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने देवगीरीच्या यादवांचा पराभव केल्यानंतर, चंद्रपूरच्या गोंड राजांनी या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आधुनिक काळात हा जिल्हा स्वतंत्र प्रशासकीय एकक म्हणून ओळखला जातो.
प्रश्न: 7. गडचिरोलीची भूगोल काय आहे?
उत्तर: गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य भागात आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 14,412 चौ.कि.मी. आहे. जिल्ह्याच्या 76% क्षेत्रावर जंगल आहे, ज्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगलव्याप्त जिल्हा ठरतो. येथील प्रमुख नद्या म्हणजे वैनगंगा, इंद्रावती, प्राणहिता आणि गोदावरीच्या उपनद्या. जिल्ह्यातील भामरागड, टिपागड, पलसगड आणि सुरजागड या भागांत उंच टेकड्या आहेत. हवामानाबद्दल बोलायचे तर, येथे उन्हाळ्यात खूप उष्णता आणि हिवाळ्यात खूप थंडी असते.